जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कढोली येथील १७ वर्षीय मुलाने राहत्या घरात विषारी औषध घेतल्याची घटना १४ मे रोजी दुपारी २ वाजता घडली होती. त्याच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना सोमवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत मंगळवारी १८ जून रोजी सकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन जगदीश डावर वय १७ रा. कढोली ता. एरंडोल असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, पवन डावर हा मुलगा आपल्या परिवारासह कढोली गावात वास्तव्याला होता. शुक्रवार १४ मे रोजी दुपारी २ वाजता त्याने विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे त्याला नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील भाऊ असा परिवार आहे.