आ.सतीश पाटील यांनी वडिलांचे नाव न लावण्याची तयारी करावी : ना. गिरीश महाजन

13giri 20satish

 

नाशिक (वृत्तसंस्था) जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी वशीकरणाचा मंत्र शिकून मुख्यमंत्र्यांना वश केल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी जळगावात केली होती. त्यावर वशीकरणाचे विधान बालिशपणाचे आहे. निवडणूक हरल्यावर आ.पाटील यांनी आपल्या वडिलांचे नाव न लावण्याची तयारी करावी, असे प्रत्युत्तर ना.महाजन यांनी दिले आहे.

 

आमदार सतीश पाटील यांनी निवडून आलो नाही तर वडिलांचे नाव लावणार नाही, असे आव्हान ही दिले होते. १९ सप्टेंबरला नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असल्याने सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आले होते, त्यावेळी त्यांनी सतिश पाटलांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

Protected Content