नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गवर अचानक धावती कार पेटली

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेची लाट आली असून त्यामुळे एका वाहनाने महामार्गावर अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर निफाड तालूक्यातील पिंपळस ते गोंडेगाव फाटयाजवळ धावत्या कारला अचानक आग लागली. बानगंगा पुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने यात चालक थोडक्यात बचावला आहे. आकाश राजेंद्र राऊत असे चालकाचे नाव आहे. परंतू कारने नेमका पेट का घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेत कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.

Protected Content