नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हवाई दलाचे सोमवार पासून बेपत्ता झालेले एएन-32 विमानाची माहिती देणाऱ्यास हवाई दलाने पाच लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
हवाई दलाचे एएन-32 हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. पण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटताच हवाई दलाने विमानाचा शोध सर्वत्र सुरू केला आहे. मात्र अद्याप या बेपत्ता विमानाचा शोध लागलेला नाही. शिलाँगमध्ये संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर मार्शल आर. डी. माथूर, AOC इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बेपत्ता विमानाची माहिती सांगणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बेपत्ता विमानाच्या लोकेशनची माहिती 0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या क्रमांकावर देता येईल, असे ही विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी सांगितले आहे.