जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सेंट्रल फुले मार्कट येथे काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमणाचे कारण देत त्यांना मनपाने त्यांचे गाडे मार्कटच्या बाहेर काढले होते. त्यानंतर हॉकर्स युनियन संघाने आज मंगळवारी ३० जुलै रोजी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेटत घेऊन त्यांची व्यथा मांडली. व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे व्यवसाय बंद झाल्यामुळे पायाभूत सुविधांसाठी असणाऱ्या खर्चासाठी त्यांच्याकडे उत्पन्राचा कोणताही स्त्रोत त्यांच्याकडे नाही आहे. यावेळी त्यांनी आयुक्तांना आपल्या मागणीचे निवेदनही दिले.
हॉकर्स युनियनने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अंमलबजावणी करून मिळावी आणि पथविक्रेता समिती गठीत करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. राज्य शासनाचा नगर विकास विभागाचा २१ सप्टेंबर २०१३ रोजीचा जीआर निवेदनासोबत जोडण्यात आला आहे.
यावेळी मनपा आयुक्तांना निवेदन देताना अध्यक्ष नंदू पाटील, उपाध्यक्ष सय्यद सादिक, सचिव सचिन जोशी, भरत पवार, बापू चौधरी, रवी चौधरी, लल्ला गवळी, ज्ञानेश्वर शिवदे, इरफान शेख, वसंत गवळी, पप्पू ठाकूर, शुभम सोनार, मनोज चौधरी, प्रवीण जोशी, अब्दुल कादिर शेख आयुब, ज्ञानेश्वर चौधरी, मुक्तार शेख, नितीन सोनवणे, अशोक कटारिया, विजय कटारिया, सय्यद रईस, जमील शेख, दिनेश मोतीरामाणी, दीपक पाटील, फिरोज खान, राहुल सपकाळे यासर्वांसह १०० ते १२५ हॉकर्स उपस्थित होते.