Home Cities जळगाव इकरा युनानी मेडीकल कॉलेजतर्फे कोलकाताच्या घटनेच्या निषेध रॅली

इकरा युनानी मेडीकल कॉलेजतर्फे कोलकाताच्या घटनेच्या निषेध रॅली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । इकरा युनानी मेडिकल कॉलेजतर्फे पश्चिम बंगाल मधील कोलकाताच्या घटनेच्या देश भ्रात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे निषेध रॅलीचे आयोजन काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, डॉ. नसीम अन्सारी, डॉ. अजिम काझी, डॉ. अनिस शेख, डॉ. समिना खान, डॉ. नाजेमा खान, डॉ. सुमेया सालार, डॉ. गझाला अन्सारी, डॉ. एजाज शाह, डॉ. मुजिब पिंजारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्याने सहभाग घेतला या रॅलीचे प्रारंभ डॉ. अब्दुल करीम सालर यांनी केले.

त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि आपल्या देशात महिला सुरक्षा हा गंभिर विषय आहे. आणि आज देशात आई, बहिण सुरक्षीत नाही. चार चार वर्षाच्या मुली सुरशित नाही डॉ. महिला हया 24 तास डुयटी करता त्या सुध्दा सुरक्षित नाही. देशात कडक कायदा पाहिजे त्यामुळे महिला हया सुरक्षित राहातील. आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी या रॅलीचे आयोजन केले व तसेच महाविद्यालयाचे स्टॉफ यांचे सुध्दा अभिनंदन करतो. व नंतर रॅलीची सुरुवात करण्यात आले रॅली काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने येऊन भाऊच्या उद्यान जवळ येऊन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा आपले मनोगत व्यकत केले व या घटनेचा तीव्र निषेध करत रॅलीचे समापन करण्यात आले.


Protected Content

Play sound