जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, असा आरोप करत जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शहरातील आकाशवाणी चौकात सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शिंदे व फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार आव्हाड यांच्यावर दाखल गुन्ह्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात सर्वत्र नुकते हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात चुकीची माहिती देण्यात आल्याचे सांगत आमदार जितेंद्र आव्हाड चित्रपटगृह बंद केले होते. दरम्यान, यासंदर्भात ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासात दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आकाशवाणी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, योगेश देसले, युवक जिल्हा उपाध्यक्ष भगवान सोनवणे,सुनिल माळी ,राष्ट्रवादी युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.