होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त धरणगाव शहरातून पथसंचलन

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गृहरक्षक दल होमगार्ड संघटनेची स्थापना डिसेंबर १९४६ मध्ये करण्यात आली होती. या अनुषंगाने होमगार्डच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त धरणगावातील मुख्य रस्त्यांवरून बँड पथकाद्वारे पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले स्मारक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना माल्यार्पण करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी होमगार्डचे तालुका समादेशक अधिकारी ईश्वर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन करण्यात आले. यावेळी होमगार्ड जवाना त्यांचे कर्तव्य व उद्देश विमोचन, अग्निशमन, बचावकार्य अणी संघटने बाबत माहिती देण्यात आली. या प्रसंगी पथकातील पलटण नायक ईश्वर पाटील, लिपिक जानकीराम पाटील, अनिल सातपूते, निखिल चौधरी, भगवान महाजन, अनिल महाजन, ईश्वर चौधरी, बॅण्ड पथक आत्माराम चौधरी, गिरधर महाजन, भिकन लोहार, समाधान सोनवणे, प्रशांत सोनवणे, महिला होमगार्ड लताबाई वाणी, रेखा चौधरी असे पथकातील अनेक होमगार्ड उपस्थित होते.

Protected Content