जळगाव , प्रतिनिधी | ढोल ताश्यांच्या गजरात, लेझीमच्या निनादात गुरुवारी शहरात दिवंगत माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत शालेय विद्यार्थी, समाजबांधवांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान, मेहरूण यांच्यातर्फे माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सर्वप्रथम शिवतीर्थ मैदानावर गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य प्रतिमेला आयुक्त उदय टेकाळे, आ.सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. रथामध्ये गोपीनाथराव मुंडे यांची प्रतिमा अग्रभागी होती. शोभायात्रेत श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी सहभाग नोंदवत लेझीम नृत्य केले. समाजबांधवानी ढोलताशांच्या गजरात जल्लोष करीत गोपीनाथराव मुंडे यांचा जयघोष केला. महिलांनी पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रेत उपस्थित होत्या.शोभायात्रा शिवतीर्थ, नवे बस स्थानक, आकाशवाणी चौक मार्गे लाडवंजारी मंगल कार्यालय येथे समाप्त झाली. यात्रेत १ हजार ५०० पेक्षा अधिक समाजबांधव, नागरिकांनी उपस्थिती दिली. मंगल कार्यालयात इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी उत्स्फुर्तपणे ३५ जणांनी रक्तदान केले. शोभायात्रेसाठी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या समन्वयाखाली संतोष चाटे, अनिल घुगे, चेतन सानप, किशोर ढाकणे, ज्ञानेश्वर लाड, हर्शल ढाकणे, दीपक वाघ, दुर्गेश नाईक, रितेश लाडवंजारी, गणेश पाटील, समाधान देशमुख, सचिन इखे, महेश घुगे, शेखर लाड, चेतन वाघ, योगेश नाईक, आबा ढाकणे, मिलिंद आंधळे, एकनाथ वाघ, गजानन पाटील, हेमंत वाघ, राकेश लाड, तेजस पाटील, राहुल सानप, शुभम वंजारी, भिकन सानप आदींनी परिश्रम घेतले.
उद्धव गीते यांचे व्याख्यान
शोभायात्रा संपल्यानंतर जालना येथील शिवव्याख्याते उद्धव गीते यांचे “गोपीनाथरावजी मुंडे – एक संघर्ष” याविषयी व्याख्यान झाले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे, वरणगाव येथील नगराध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, भाजपचे सभागृह नेता ललित कोल्हे, नगरसेवक सुनील महाजन, कैलास सोनवणे, अभिषेक पाटील, बजरंग दलाचे ललित चौधरी, संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, उपाध्यक्ष विजय वंजारी, सचिव प्रवीण सानप उपस्थित होते. त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. प्रसंगी वंजारी समाजाच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांनी लोकार्पण केले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे यांनी मनोगतात गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याविषयी गौरव करीत समाजाने त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असे सांगितले. यावेळी व्याख्याते उद्धव गीते म्हणाले की, भरकटलेल्या समजाला एकवटण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. गरिबीच्या परिस्थितीत मात करीत त्त्यांनी शिक्षण घेतले. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम तरुण वयात मुंडे यांनी केले. १९९५ साली गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुन्हेगारी नियंत्रणात आणली. गोपीनाथ मुंडे जेथे गेले तेथे त्यांनी इतिहास निर्माण केला, असे सांगत उद्धव गीते यांनी मुंडे साहेबांनी आम्हाला झुंझायला शिकविले. संघर्ष केल्याशिवाय आणि एकजूट राहिल्याशिवाय समाजाला यश मिळत नाही हि शिकवण त्यांनी दिली. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी त्यांनी कारावास भोगला होता. अशी माहिती दिली. सूत्रसंचालन व प्रस्तावना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी तर आभार चंद्रकांत लाडवंजारी यांनी मानले. यावेळी संस्थानचे विश्वस्त योगेश घुगे, कृष्णा पाटील, नंदू वंजारी, कैलास सांगळे, किरण वाघ, उमेश वाघ, विनोद ढाकणे, समाधान चाटे, जामनेर येथील अजय नाईक, कैलास पालवे, जितू काळे, किशोर पाटील उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/494363691173419