Home क्राईम वृद्ध महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची पोत लंपास

वृद्ध महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची पोत लंपास


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी ३० जानेवारी रोजी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप हायस्कूलसमोर घडली.

निर्मला जनार्दन चौधरी (वय ६८, रा. प्रेमनगर) या आपले पती आणि भावासोबत पायी घरी जात होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची आणि ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने ओढून नेली. चोरटे शाळेच्या मागील गल्लीतून फरार झाले असून, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound