रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला बसने चिरडले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माहीम आगारात बेस्ट बसखाली चिरडून एका ३० वर्षीय अज्ञात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत व्यक्ती माहीम बस डेपोबाहेर झोपली असताना डेपोतून बाहेर पडलेल्या बसने त्यांना चिरडले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे. बसचालक निष्काळजीपणामुळे संबंधित व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. यशवंत नांगरे (वय, ५६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे.

माहीम आगाराजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती माहीम पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका बसच्या उजव्या चाकाजवळ सुमारे ३० वर्षीय एक अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी जखमी व्यक्तीला सायन रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी बसचालक यशवंत नांगरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बसचालक निष्काळजीपणे गाडी चालवत होता आणि रस्त्यावर झोपलेली व्यक्ती त्याला दिसली नाही.

Protected Content