जळगाव प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल प्रिन्स पॅलेस समोर भरधाव मालवाहू रिक्षाने पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, अर्जून दिनकर कोळी (वय-१६) रा. नांद्रा हवले त. जामनेर ह.मु. कुसुंबा ता. जि.जळगाव हा मुलगा मित्रांसोबत ८ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पायी जात होता. करत होते. अजिंठा चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल प्रिन्स पॅलेस समोर पायी जात असतांना भारधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९ सीवाय ५०५२) मालवाहू गाडीने अर्जूनला जोरदार धडक दिली. यात अर्जूनचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याचा तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेा आहे. याप्रकरणी अर्जूनचा मित्र ऋषीकेश समाधान कोळी यांच्या फिर्यादीवरून मालवाहू वाहनाच्या चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.