अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | साबरकांठा जिल्हयातील वडाली येथे एका प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी बॉम्ब पाठवला होता. या बॉम्बच्या स्फोटामुळे विवाहित प्रेयसीचा नवरा आणि मुली यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या वृत्तानुसार , जयंतीभाई वंजारा असे प्रियकराचे नाव आहे. त्यांचे बॉम्ब स्फोटात मृत झालेल्या व्यक्तीच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते.
पण त्यांच्या काही दिवसांपासून दुरावा वाढला होता. त्यामुळे जयंतीभाई यांनी टेपरेकॉर्डरसारख्या एका पार्सल बॉक्समधून स्फोटके आपल्या प्रेयसीच्या घरी पाठवले होते. हे पार्सल प्रेयसीचे पती जीतूभाई यांनी उघडले असता बॉक्समध्ये स्फोट झाल्यामुळे जीतूभाईसह १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आरोपीने बॉम्बचे साहित्य राजस्थानमधून खरेदी करून बॉम्ब आपल्या घरीच तयार केला होता.