जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या सहा वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना घडली असून सदर घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे, यासाठी जामनेर तालुका आदिवासी संघटनेतर्फे मोर्चा काढून तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास सुभाष उमाजी भील (वय 35 राहणार चिंचखेडा) या आरोपीने एका सहा वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला बागेत नेऊन तिच्यावर अत्याचार करत बालिकेचा खून केल्याची घटना घडली असून 24 तास उलटूनही आरोपी अद्याप सापडला नाही. त्यामुळे तात्काळ आरोपीला शोधून अटक करावी व त्याच्या खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून त्याला फाशीची शिक्षा द्या. या मागणीसाठी आदिवासी भील समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुधाकर सोनवणे, आत्माराम ठाकरे, राजू मोरे, भगवान मोरे, दिनेश सोनवणे, संतोष ठाकरे, राजू पवार, सागर गोसावी, रवींद्र ठाकरे, श्रीराम कोळी, श्रावण कोळी यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सदर घटनेचा तपास पोलीस स्तरावरून मोठ्या प्रमाणावर चालू असून अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय वेरूळे जामनेर येथे असून लवकरात लवकर आरोपी शोधून त्याला अटक करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय वेरूळ यांनी माध्यमाची बोलताना दिली आहे.