वरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरात असलेल्या पाणी फिल्टर प्लॉनजवळ नगरपालिका कर्मचाऱ्याला काहीही कारण नसंताना तीन जणांनी ड्यूटीवर येत असतांना काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरात वरणगाव नगरपालिकेचे मालकीचे पाणी फिल्टर प्लॉन आहे. याठिकाणी यशवंत रामदास इंगळे (वय-५८) रा. आंबेडकर नगर, भुसावळ हे नोकरीला आहे. मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता यशवंत इंगळे हे कामावर आले. त्यावेळी सुनिल भिका भुसांडे रा. रामपेठ वरणगाव याच्यासह इतर अनोळखी दोन उपस्थित होते. “कामावर लवकर का आला” असे बोलून यशवंत इंगळे यांना तिघांनी लाकडी काठीने मारहाण केली. व तिघे पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर यशवंत इंगळे यांनी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सुनिल भिका भुसांडे आणि इतर अनोळखी दोन जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नागेंद्र तायडे करीत आहे.