किनगाव-यावल रस्त्यावर एका मोटरसायकलस्वारास लुटले; आरोपीला दोन तासातच अटक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | किनगाव-यावल रस्त्यावर मागवून चालणाऱ्या मोटर सायकलला लाथ मारून दुसऱ्या मोटरसायकल स्वाराने पुढे गाडी उभी करून त्याची कडून बळजबरीने त्याचे खिशातील दहा हजार रुपये रोख व १२ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला प्रतिरोध केला असता धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना किनगाव गावाजवळ यावल कडे येताना हॉटेलच्या पुढे मध्यरात्री घडल्याचे घटना घडली आहे. याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी यावल पोलिसांनी अवघ्या दोन तासातच आरोपींना ताब्यात घेतल्याची समजते.

सविस्तर वृत्त असे की भालसिव पिंपरी तालुका यावल येथील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे व त्यांचे सोबत शिवलाल भगवान सपकाळे हे चोपडा येथे शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेसाठी चोपडा येथे गेले होते ते रात्री अकरा वाजून ४५मिनिटांनी किनगाव पासून यावल कडे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल एम एच १९ बी एल झिरो झिरो ५१ द्वारा येत असताना मागावर एम एच २८ ए डब्ल्यू २३८ पांढरा रंगाची स्कुटी वरून दोन जण आलेत व त्यांनी मोहन सपकाळे यांच्या गाडीला लाथ मारली गाडी थांबवली. मात्र दोघं आरोपी यांनी त्यांच्या मोटरसायकल पुढे स्कुटी लावून” तुम्हारे पास के सारे पैसे मुझे दे दो नही तो मै तुम्हे मार डालुंगा” अशी धमकी दिली व त्याला मोहन एकनाथ सपकाळे यांनी विरोध केला असता टॉपर धारदार शस्त्राने त्यांच्या डाव्या बाजूची कमरेतून काढून धमकावले व मानेच्या उजव्या बाजूला चॉपरटी दुखापत केली पॅन्ट चे मागील खिशातून दहा हजार रुपये रोख व शर्टाच्या खिशातील अँड्रॉइड १२ हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला त्याला विरोध केला असता सोबत असलेला शिवलाल भगवान सपकाळे यास या दोघं आरोपींची लाथाबुकच्यानी मारहाण केली व यावलच्या दिशेने पडून गेले त्यांनी २२ हजाराचा ऐवज यांच्याकडून लांबविला.

याबाबत मोहन सपकाळे सरपंच पिंपरी यांनी तात्काळ यावल पोलीस स्टेशन गाठले व त्यांच्या जवळ असलेल्या मोटरसायकलचा नंबर त्यांनी पाहिलेला होता त्यानुसार तक्रार दिली याबाबत यावल पोलीस स्टेशनला भाग पाच गुर नंबर ४५३ / २०२४ कलम ३o९-( ४) ३०९ ( ६) ३ , ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पी आय यावल पोलीस स्टेशन प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे करीत आहे. पोलीसांनी तपासाची चक्रे रात्रीच फिरवून अवघ्या काही तासातच सदरची गुन्हे कामी वापरण्यात आलेली गाडी कुणाची याचा तपास लावून दोघं संशयीत आरोपींना ताब्यात घेतले असून,पोलीसांनी गुन्ह्याची पुढील कारवाई सुरू केली आहे

 

 

 

Protected Content