पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील दळवेल गावातील एका भागात राहणाऱ्या कुटुंबातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अतिप्रसंग करत विनयभंग केल्याचा संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील दळवेल गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आईवडील, बहिणी व भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. रविवार ६ऑक्टोबर रोजी पिडीत मुलीचे वडिल हे सकाळी दुध काढण्यासाठी निघून गेले. त्यानंतर तिची आई व भाऊ हे घराच्या बाहेर घरातील कामे करत असतांना त्यांच्या घराच्या समोर राहणारा राकेश शांताराम पाटील वय २८ हा पिडीत मुलगी ही घरात झोपलेली असतांना घरात शिरला. त्यानंतर पिडीत मुलीचे दोन्ही हात पकडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीने आरडाओरड केली असता तिची आई व भाऊ हे धाव घरात आले. दोघांना पाहून संशयित आरोपी राकेश पाटील हा पळून गेला. महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यावर पिडीत मुलीच्या पालकांनी मुलाला जाब विचारला असतान दोघांना शिवीगाळ करत धमक्या देवू लागला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीच्या पालकांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राकेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनिरी अमरसिंग बसावे हे करीत आहे.