मुक्ताईनगरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुनील भोई रा. मुक्ताईनगर, जळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान २६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमास संशयित आरोपी सागर भोई याने पीडित मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळून नेले. दरम्यान या घटनेबाबत दुसऱ्या दिवशी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी सागर भोई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे हे करीत आहे.

Protected Content