जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रेल्वेस्टेशन जवळील बिग बाजार परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता अल्पवयीन मुलगी ही जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनजवळील बिग बाजार परिसरात आलेली होती. त्यावेळी संशयित आरोपी लक्ष्मण बंडू सपकाळे वय-१८ या तरुणाने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळून नेले.
दरम्यान पीडित मुलीच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र पीडित मुलगी मिळून आली नाही. त्यामुळे अखेर शुक्रवार १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी लक्ष्मण सपकाळे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी लक्ष्मण सपकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करत आहे.