धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द गावातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता पिडीत मुलगी ही आपल्या परिवारासह घरात झोपलेली असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आला. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यानंतर तिच्या पालकांनी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मधुकर उंबरे हे करीत आहे.