भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवार १२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पिडीत मुलगी ही एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना समोर आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश पालवे हे करीत आहे.