अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रताप कॉलेज परिसरातून एका अल्पवयीन मुलील अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याचे समोर आले आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील शांताबाई नगरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. गुरूवार १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही शहरातील प्रताप कॉलेज परिसरात आलेली असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात ररत्री ९.३० वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नाना पवार हे करीत आहे.