जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आदर्श नगरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लिल हावभाव करत तिचा हात पकडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १३ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आदर्श नगरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, सोनू दर्शन थोरानी रा.सिंधी कॉलनी, जळगाव हा १३ मे रोजी दुपारी २ वाजता पिडीत मुलीच्या घरासमोर येवून तिच्याशी अश्लिल हावभाव करत तिचा हात पकडून विनयभंग केला. तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी सोनू दर्शन थोरानी रा.सिंधी कॉलनी, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे हे करीत आहे.