अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खर्दे गावातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना ३ जून रोजी रात्री ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ८ जून रोजी रात्री १० वाजता मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील खर्दे गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. गावात राहणारा रविंद्र फुलसिंग सोनवणे रा. खर्दे हा कायम मुलीकडे वाईट नजरेने बघत होता. दरम्यान ३ जून रोजी रात्री ९ वाजता पिडीत मुलगी ही अमळनेर रोडवर पायी जात असतांना रविंद्र सोनवणे याने मुलीचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर पिडीत मुलीने हा प्रकार घरातील नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार पालकांसोबत तिने मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवार ८ जून रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी रविंद्र सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.

Protected Content