जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नविन बसस्थानक परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना गुरूवार ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक अशी की, जळगाव तालुक्यातील भोकर गावातील एका भागात १६ वर्षीय मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती शिक्षणासाठी जळगाव येथील एका महाविद्यालयात जात असतात. दरम्यान गुरूवार ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी रविवारी ७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.