बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची गंभीर घटना मंगळवारी (७ जानेवारी) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना कशी घडली?
पीडित मुलगी ही एरंडोल तालुक्यातील नागदुली गावातील रहिवासी आहे. ती आपल्या कुटुंबासह तेथे वास्तव्याला आहे. मंगळवारी सकाळी ती जळगाव शहरातील नवीन बसस्थानकावर काही कारणासाठी गेली होती. याच दरम्यान, कल्पेश नवल माळी (वय २५), राहणार नागदुली, याने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे.

पोलिसांची कारवाई :
या घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, बुधवारी (८ जानेवारी) सायंकाळी ७.३० वाजता संशयित कल्पेश माळीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दादासाहेब वाघ करीत आहेत. पोलीस अधिक तपास करून आरोपीचा शोध घेत आहेत.

Protected Content