जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरात कुटुंबियांसह राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला आमिष व फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, बीड जिल्ह्यातील राहणारे कुटुंबिय जळगावातील एमआयडीसी कंपनीत कामाच्या निमित्ताने येथे राहत आहे. ११ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कुटुंबिय जेवण करून झोपले होते. दरम्यान रात्री ११ ते १ वाजेच्या दरम्यान अयोध्यानगरातील रहिवाशी असलेला तुषार चौधरी (पुर्ण नाव माहित नाही) या तरूणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले असल्याची माहिती पिडीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीसांनी दिली. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तुषार चौधरी या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.