धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १० मार्च रोजी सकाळी ९ वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना ती बेपत्ता झाली. तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. पिडीत मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पिडीत मुलीच्या पालकांनी पोलीसात दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.




