अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चांदूर बाजार येथे एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने गाडीवर बसवून तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींनी मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी तिच्या डोळ्यात आणि तोंडात वाळू कोंबली. यानंतर त्यांनी तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात अली असून त्यांच्या विरोधात पॉस्को व अॅट्रोसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय प्रकाश खाडे, राजेश कोहळे, आकाश पिल्लारे आणि शिवाजी चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी पिडीत मुलीने तक्रार दिली आहे. ही घटना २९ जून रोजी संध्याकाळी ७ ते १० च्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार पिडीत मुलगी ही किराणा दुकानात सामान घेण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी शिवाजी चौधरीने तिला आवाज देत जवळ बोलावले. यावेळी त्याने तुला तुझ्या आजीकडे सोडतो, अशी बतावणी करत मुलीला गाडीवर बसवले. पिडीत मुलीला तिच्या आजीकडे न सोडता निर्जन स्थळी गाडी थांबवली. त्या ठिकाणी त्याने मुलीवर बलात्कार केला. यावेळी मुलीने प्रतिकार केला, मात्र, त्याने मुलीच्या डोळ्यात आणि तोंडात वाळू कोंबली. असे असतांनाही मुलीने विरोध केल्याने त्याने तिला चाकू भोसकून मारण्याचा देखील प्रयत्न केला.
शिवाजीने त्याचा मित्र व दुचाकीचा मालक राजेश कोहळे याला बोलावले. यावेळी त्याने देखील मुलीवर बलात्कार केला. तर थोड्या वेळाने इतर आरोपी आकाश व अक्षयही तेथे आले. यानंतर त्यांनी मुलीला घरी सोडले. पिडीत मुलगी ही खूप घाबरली होती. तिने हिम्मत करत ही घटना पालकांना सांगितली. यानंतर पालकांनी व मुलीने पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली.त्यानुसार रविवारी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता, त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.