फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह अरस्तू वास्तव्याला आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात असताना तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी तिचा परिसरात आणि नातेवाइकांकडे शोधाशोध केली. परंतु अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून आली नाही. या संदर्भात अल्पवयीन मुलीचे वडील यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.