यावल तालुक्यातून अल्पवयीन मुलीला पळविले

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील तळेगाव न्हावी येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील तळेगाव न्हावी येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुलगी ही मैत्रिणीकडे जात असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परिसरातील नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधाशोध केली, परंतु कुठेही आढळून आली नाही. दरम्यान गुरुवारी २० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर फैजपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल देविदास सूरदास करीत आहे.

Protected Content