रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रसलपुर येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना काल रोजी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबतचे वृत्त असे की रसलपुर येथील एका चौदा वर्षीय बालिकेस आरोपी सुंता भुरसिंग बारेला या युवकाने काल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून नेले. याबाबत बालिकेच्या वडिलांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमृत पाटील व पोलिस करीत आहेत.