किरकोळ वादातून दोन गटात दगडफेक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। जळगाव शहरातील जोशी वाडा परिसरात लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून दोन गटात झाला. या वादातून दगडफेक करण्यात आली. संतप्त जमाव आक्रमक होत एकाचा घराचा दरवाजा तोडला. पाण्याची टाकी फोडली. तसेच दगड भिरकविले. ही घटना मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ धाव घेत जमावाला शांत केले. याठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात रस्त्यावर दगडांचा खच पडल्याचे दिसले.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जोशी वाडा परिसरात लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून दोन गटात झाल. दरम्यान दोन्ही गट आमने सामने आक्रमक झाल्याने वाद पेटला. त्यानंतर दगडफेक करण्याला सुरुवात झाली. यात दोन जणांना किरकोळ दुखापत झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गर्दीला नियंत्रित केले. दरम्यान दोन गटात वाद होऊन वातावरण शांत असून अफवांवर विश्वास ठेवू नये. दोन्ही गटातील टवाळखोरांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Protected Content