जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चोरट्यांनी आता थेट पोलीस चौकीच्या परिसरालाच लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. जळगाव शहरातील महाबळ कॉलनी पोलीस चौकीच्या अगदी जवळ असलेल्या रोडवरून चोरट्यांनी २ लाख ७० हजार रुपये किमतीची ‘महिंद्रा मॅक्सिमो’ मिनी व्हॅन लंपास केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुषार उदय वाणी (वय २८, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची मॅक्सिमो मिनी व्हॅन (क्र. MH 04 GE 5669) ही नेहमीप्रमाणे महाबळ कॉलनी पोलीस चौकीच्या जवळील रोडवर उभी केली होती. ३ फेब्रुवारी च्या रात्री ६ वाजेच्या सुमारास ही गाडी चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चोरट्यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने ही गाडी पळवून नेली.

गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच तुषार वाणी यांनी परिसरात शोध घेतला, मात्र गाडी मिळून आली नाही. अखेर त्यांनी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १९:०३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या वाहनाची किंमत सुमारे २ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत हे करीत आहे.



