रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत केळी लिलाव आणि स्थिर भावाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत व्यापारी केळी खरेदी केल्यानंतर पैसे देत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. केळी लागवड चक्राकार पद्धतीने करण्याची शिफारस बैठकीत करण्यात आली आणि चार ते पाच बाजार समित्यांनी मिळून भावाबाबत निर्णय घ्यावा,असेही बैठकीत ठरले आहे.
रावेर शहरातील सैनिक हॉलमध्ये केळी बाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी बोगस व्यापाऱ्यांना आळा घालण्यासाठी बँक गँरेंटी घेण्याची सूचनाही करण्यात आली. इतर राज्यांतील व्यापाऱ्यांचे पैसे अडकतात, हेही चर्चेत समोर आले. केळीच्या समस्यांवर आणि अडचणींवर सखोल चर्चा झाली. बाजार समित्यांनी दर निश्चित करून प्रसिद्धी द्यावी, अशी मागणी उपस्थितांनी केली. तथापि, बैठक संपल्यावर केळी लिलाव पद्धत आणि भाव स्थिरतेबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, तालुका कृषी अधिकारी श्री. वारके, यावल सभापती हर्षल पाटील, प्रल्हाद पाटील, राजेंद्र चौधरी, बुरहानपूर बाजार समिती सचिव महेंद्रसिंग सिकरवार, सभापती सचिन पाटील उपसभापती योगेश पाटील, संचालक मंदार पाटील, जयेश कुयटे, पांडू पाटील, योगीराज पाटील, गणेश महाजन, रोहित अग्रवाल, नायब तहसीलदार संजय तायडे, धनंजय चौधरी, दिनेश पाटील सुरेश पाटील, डी डी वाणी,आदी महत्त्वाचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीला बऱ्याप्रमाणात व्यापाऱ्यांनी दांडी मारली होती.
दरम्यान, बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी केळी भावा बाबत आणि काही व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लुबाळणुकी बाबत तक्रारी केल्या. यावेळी नंदकिशोर महाजन यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या समोर मांडल्या. यावेळी योगीराज पाटील यांनी केळी लिलाल पद्धत कसा शेतक-यांचा फायदाचा आहे. हे बैठकीत शेतक-यांना सांगितले.विशाल अग्रवाल, व हरिष गनवाणी यांनी व्यापा-यांना येणाऱ्या समस्या बैठकीत मांडल्या,सुरेश धनके प्रल्हाद पाटील यांनी देखील शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या व अडचणी बाबत तक्रारी मांडल्या.