यावल प्रतिनिधी । भारत सरकारच्या वतीने पारीत करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे समर्थनार्थ आज (दि.२६) सकाळी ११ वाजता राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. हजारो नागरिक कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून महामोर्चात स्वयंमस्फूरतिने सहभागी झाले आहेत.
देशातील काही संघटना या सीएबी नागरिकत्व संशोधन कायद्याबद्दल देशवासीयांमध्ये अर्धवट व चुकीची माहिती पसरवून देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात येत आहे. देशात अशा प्रकारे हिंसाचार पसरविणाऱ्या व्यक्ती व संघटनेवर शासनाच्या योग्य ती चौकशी करून गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन यावल येथील निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांना यावेळी देण्यात आले.
या भागामध्ये कायद्याचे स्वागत
शहरातील बोरावले गेट परिसरातून केंद्र शासनाने पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, येथील धार्मिक अत्याचार पिढीत निर्वासित हिंदू, बौद्ध, जैन, पारसी आणि इसाई धर्माच्या बांधवाना नागरिकत्व देण्यासंदर्भात भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासीक असे नागरिकता संशोधन विधेयक सीएबी बहुमताने पारित झाले आहे. राष्ट्रपती महोद्य यांनी या विधेयकावर आपली स्वाक्षरी देवून याचे रुपांतर नागरिकता संशोधन कायद्यात झालेले आहे. या नव्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून पारीत झालेल्या कायद्याचे देशात सर्व ठिकाणी मोठया प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या आयोजन राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष डॉ.कुदंन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या नागरीकत्व या विधेयकाला पाठींबा देण्यासाठी माजी आमदार हरीभाऊ जावळे, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, माजी उपसभापती राकेश फेगडे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, विलास चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, मसाकाचे चेअरमन शरद महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते व युवक या मोर्चात मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.