Home Cities जळगाव जळगावात पाकिस्तानच्या निषेधार्थ भव्य मोर्चा (व्हीडीओ)

जळगावात पाकिस्तानच्या निषेधार्थ भव्य मोर्चा (व्हीडीओ)



जळगाव (प्रतिनिधी) पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंच व स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला दुपारी घाणेकर चौकातील चौबे शाळेपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी पाकिस्तानचा मोठा झेंडा रस्त्यावर अंथरून त्याला पायदळी तुडवण्यात आले.

आज दुपारी ४ वाजता हा मोर्चाला चौबे शाळेपासून सुरूवात झाली. हा मोर्चा घाणेकर चौक,टॉवर चौक, नेहरू चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, कोर्ट चौक,स्टेडियम चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकापासून हा मोर्चा शहरात फिरला. यावेळी मोर्चेकर्यांनी पाकिस्तान व दहशतवाद विरोधात जोरदार घोषणा दिल्या. या मोर्चात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पहा– हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound