

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे. या माध्यमातून गिरीशभाऊ महाजन यांचा एक विश्वासू सहकारी निवडणुकीत मोलाची भूमिका पार पाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे ना. गिरीशभाऊ महाजन यांचे विश्वासू सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नेते मानले जातात. आजवरच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. या अनुषंगाने आता ते जळगाव महापालिकेत मोलाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आज भारतीय जनता पक्षाने विविध महापालिकांसाठी प्रभारींची घोषणा केली आहे. यात जळगाव महापालिकेची जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे. यामुळे आता जळगाव महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी आ. मंगेश चव्हाण झटून प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि आ. राजूमामा भोळे यांना देखील एक मातब्बर सहकारी निवडणुकीच्या कालखंडात मिळणार आहे.



