रिक्षाला कट मारण्यावरून एकाला चौघांकडून बेदम मारहाण !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिक्षाला कट मारण्यावरून एका व्यावसायिकाला अज्ञात चार जणांनी रेमंड चौफुलीजवळू शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून टणक वस्तू डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय रामगोपालजी तापडीया (वय ५६ रा. एमआयडीसी, जळगाव) हे बुधवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रेमंड चौकातून दुचाकीने जात असतांना अज्ञात चार जणांनी त्यांचा रस्ता आडविला. रिक्षाला कट का मारला असे बोलून अज्ञात चार जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच काहीतरी टणक वस्तू डोक्यात टाकून गंभीर जखमी केली. याप्रकरणी संजय तापडीया यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे अज्ञात चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.