बसस्थानक आवारातून गावठी पिस्तूलासह एकाला अटक

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील बसस्थानक आवारात नियंत्रण कक्षासमोवर गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार ११ जुलै रोजी रात्री ११ ते १२ जुलेै रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरात पोउनि सुभाष पाटील, पोहेकॉ राहूल सोनवणे, पोहकॉ नितीश पाटील, पोना महेद्र पाटील, पोकॉ समाधान पाटील, अमोल पाटील, आशुतोष सोनवणे, विजय पाटील, राकेश महाजन, रविद्र बच्छे, पवन पाटील, मनोज चव्हाण हे पेट्रोलिंग करत होते. त्यातील पोकॉ समाधान पाटील , अमोल पाटील हे चाळीसगाव बसस्थानक आवारातील नियंत्रण कक्षासमोर एक तरूण संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आला. त्याला पोलीसांनी अटक केली. त्याने गणेश तुकाराम पवार वय २५ रा. बोरमाळी, पो. नागद, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर असं सांगितले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ गावठी बनावटीचा पिस्तूल आढळून आला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलीसांनी अटक केली. त्याजवळील पिस्तूलही जप्त करण्यात आले. याप्रकरणी पो कॉ समाधान पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय माळी हे करीत आहे.

Protected Content