कन्नड घाटातून एकाची लांबवली दुचाकी

चाळीसगाव प्रतिनिधी । कन्नड घाटातील महादेव मंदिराजवळ एका ऊसतोड मजुराच्या मुलाने उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहेत.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पाथर्डे येथील रमेश भावडू चव्हाण (वय-३५ रा.पाथर्डे ता. चाळीसगाव)  हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दरम्यान रमेश चव्हाण यांचा मुलगा तुकाराम चव्हाण यांनी कन्नड घाटातील महादेव मंदिराजवळ वैयक्तिक कामानिमित्त दुचाकी (क्र. एम.एच. १९ डी.एफ. ५१६८) उभी केलेली असताना अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेल्याची घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. घटना घडताच त्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र ६० हजार रुपये किंमतीची सीबी  शाईन कंपनीची दुचाकी मिळून आली नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने मोटारसायकल चोरून नेल्याने त्यांच्या घरावर डोंगर कोसळले आहेत. ऊसतोडणीचे कामे करून रमेश भावडू चव्हाण हे आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असतात. मात्र या घटनेने ते अधिकच आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

 

Protected Content