Home क्राईम बंद घर फोडून ७३ हजारांचा ऐवज लांबविला ; गुन्हा दाखल

बंद घर फोडून ७३ हजारांचा ऐवज लांबविला ; गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद परिसरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. के.जी.एन. कॉलनी परिसरात असलेल्या एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकीब मलिक सादीक मलिक (वय २६, रा. जळगाव) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे घर १८ मार्च ते दि. २३ मार्च दरम्यान बंद होते. अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरातील कपाटातील आणि इतर मौल्यवान वस्तूंसह स्टडी टेबल व इतर साहित्याची उचकापाचक करून चोरट्यांनी सुमारे ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. डॉक्टर मलिक हे घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत.


Protected Content

Play sound