भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील महिदंळे येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीवारी २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मराज गोबा पाटील (वय ३९, रा. महिंदळे) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून ते व्यवसायाने डॉक्टर असून शेतीही पाहतात. १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फिर्यादींचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून २२ हजारांची रोकड, सोन्याची अंगठी आणि चांदीचे दागिने असा एकुण ५७ हजारांचा ऐव जलांबविला . याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहे.




