नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एनडीएच्या सरकार स्थापनेनंतर संसदेत पहिले सत्र सुरू आहे. सोमवारी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चेचं सत्र होतं. यादरम्यान काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधींनी नीट पेपर फुटी प्रकरण, अग्निवीर आणि मणिपूर मुद्द्यावर सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी शंकराच्या फोटो दाखवित हिंदू धर्माचा वारंवार उल्लेख केला.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदीजी एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते की, हिंदुस्तानने कधीच कोणावर हल्ला केला नाही. कारण हिंदुस्तान हा अहिंसेचा देश आहे. आपला देश घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हाच संदेश दिला की, घाबरू नका, घाबरवू नका. भगवान शंकराकडून घाबरू नका, घाबरवू नकाचा संदेश मिळतो.
भगवान शंकर त्रिशूळ आपल्या डाव्या हाताला मागच्या बाजूला ठेवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा हिंसा द्वेष द्वेष करीत राहतात. तुम्ही हिंदू नाही. हिंदू धर्मात सत्याची साथ द्या, असं सांगण्यात आलं आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं होतं. ते म्हणाले की, हा गंभीर विषय असून हिंदू धर्माचा अपमान आहे. यावर राहुल गांधींनी नरेंद्र मोदी संपूर्ण हिंदू समाज नाही. भाजप म्हणजे हिंदू समाज नाही. आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही. दरम्यान राहुल गांधींच्या भाषणातला मोठा भाग हटवण्यात आला आहे. राहुल गांधींच्या भाषणातील नरेंद्र मोदी, आएसएस, भाजपवरचा भाग नोंदीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. राहुल गांधींच्या लोकसभेतल्या भाषणाला कात्री लावल्यामुळे आजही संसदेत पुन्हा खडाजंगीची शक्यता आहे.