Home Cities भुसावळ रजनीताई सावकारे यांच्या प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

रजनीताई सावकारे यांच्या प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

0
108

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची सरगर्मी दिवसेंदिवस वाढत असून, आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये महायुतीकडून उमेदवार रजनीताई संजय सावकारे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत झालेल्या या प्रचारमोहीमेत परिसरात निवडणूक उत्साहाचा नवा उधाण दिसून आला.

आज, शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाइं, लहुजी शक्ती सेना महायुतीच्या वतीने प्रभाग 20 मध्ये उमेदवार मीनाक्षीताई धांडे व सीमाताई नरवाडे यांच्या उपस्थितीत प्रचारफेरी काढण्यात आली. रजनीताई सावकारे स्वतः या प्रचारफेरीत सहभागी झाल्या होत्या. महायुतीतील भाजप तसेच इतर घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, आजी–माजी नगरसेवक, आघाडी–मोर्चा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि महिलांचा सहभाग विशेषतः लक्षणीय होता.

संध्याकाळी पाच वाजता संतोषी माता मंदिर येथून सुरू झालेली प्रचारफेरी पंचशील नगर, गंगाराम प्लॉट आणि आठवडे बाजार परिसरातून पुढे सरकत राहिली. या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवारांचे स्वागत केले. परिसरातील नागरिकांनीही प्रचारफेरीला चांगला प्रतिसाद देत उमेदवारांशी संवाद साधला. प्रभागातील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि सार्वजनिक सुविधा याबाबत नागरिकांकडून विविध अपेक्षा व्यक्त होताना दिसल्या.

प्रचारफेरी दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी रजनीताई सावकारे यांच्याविषयी मोठा विश्वास व्यक्त करत त्यांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. “महायुतीच्या पाठबळामुळे भुसावळच्या विकासाला नवे बळ मिळेल,” अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत राहिली. परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने आगामी निवडणुकीची चुरस अधिकच रंगत जाण्याचे संकेत मिळाले आहेत.


Protected Content

Play sound