जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील फातीमा नगर येथील एका नाल्यातील पाण्यात बुडून गणेश सदाशिव पाटील (४६, रा. पिंपरुड, ता. यावल) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३ डिसेबर रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, गणेश पाटील हे एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होतो. मंगळवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी त्याच परिसरात असलेल्या फातीमा नगरातील नाल्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाळके करीत आहेत.