Home क्राईम ज्वेलर्स दुकान फोडून ७१ हजारांचा मुद्देमाल लांबविला

ज्वेलर्स दुकान फोडून ७१ हजारांचा मुद्देमाल लांबविला


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील लोहारा गावातील ज्वेलर्स दुकानाचे शटरचे लॉक तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल शंकर सोनवणे (वय-३२) रा. पहूर ता.जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात ओमसाई ज्वेलर्स शॉप नावाचे दुकान आहे. सोने चांदीच्या वस्तू विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. २७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान त्यांचे दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ८ हजारांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागने  असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार २८ ऑक्टोबर रोजी समोर आला. त्यांनी नजीकच्या पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील  तपास पोहेकॉ अरविंद्र मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound