चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी २५ वर्षीय मुकबधिर तरूणीवर अज्ञात तीन जणांनी जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गवात २५ वर्षीय तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती मुकबिधर असून तिला ऐकू व बेलता येत नाही. ४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीजवळ अज्ञात तीन जणांनी दुचाकीवर येवून तरूणीची छेडछाड केली. त्यानंतर ओढताण करून तिला मारहाण केली. यात एकाने तिच्यावर जबरी अत्याचार केला. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीला धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचारादरम्यान विशेष शिक्षकेसमोर दिलेल्या जाबाबात ईशाऱ्याने सांगितले. व आरोपी समोर असल्यास ओळखेल असे इशाराने सांगितले. इशाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख करीत आहे.