रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल मतदारसंघात खड्डेमय रस्ते,बेरोजगारी,निराश शेतकरी, आणि मेगा रिचार्जसाठी असलेल्या उदासीन धोरणाबाबत भाजपा तर्फे इच्छुक उमेदवार डॉ. कुंदन फेगडे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. त्यांनी अनेक प्रश्नांची बिनधास्त उत्तरे दिली. डॉ. कुंदन फेगडे म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून आरएसएसमध्ये सक्रिय आहे. २०१७ मध्ये भाजपाची विचारधारा मला खूप आवडली, म्हणून पक्षाचे काम करत आहे. भाजपामध्ये सर्वसाधारण कार्यकर्त्याला संधी मिळते. २०१९ ला मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो, परंतु सिटिंग आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी दिल्याने मला तेव्हा थांबावे लागले.”
२०१९ पासून रावेर व यावल तालुक्यांमध्ये जनसंपर्क सुरू ठेवला आहे. “२०२४ मध्ये मला संधी मिळाल्यास युवकांसाठी रोजगार निर्मिती करणार आहे. रोजगाराच्या शोधात अनेक माझे बंधू शहरांकडे जात आहेत. त्यांना रावेर, फैजपूर, यावल येथे रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. मागील पाच वर्षांत स्थानिक आमदारांनी युवकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे,” असे डॉ. फेगडे म्हणाले.
डॉ. फेगडे पुढे म्हणाले, “रावेर व यावल तालुक्यांमध्ये रस्त्यांची अवस्था खूप खराब झाली आहे. विद्यमान आमदार यांना मागील पाच वर्षांत मतदारसंघातील रस्त्याकडे बघायला वेळ नाही. माजी आ. स्व. हरिभाऊ जावळे यांच्या काळातील रस्ते आतापर्यंत टिकत आहेत. परंतु विद्यमान आमदारांच्या काळात रस्त्यांची कामे झाली नाहीत. जनतेने मला संधी दिल्यास प्रायोरिटीने सर्व मतदारसंघातील रस्ते तयार करण्याचे काम करणार आहे.”
“मतदारसंघात शेतकऱ्यांच्या शेतीला पानंद रस्ते नसल्याने नाराजी आहे. शेतकऱ्यांना शेतमाल काढताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी पानंद रस्त्यांची कामे माझ्या शेतकरी बांधवांसाठी करण्यात येतील. दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांची मागील पाच वर्षांत निराशा झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने माझ्याकडे बघत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
डॉ. फेगडे म्हणाले, “आरोग्याच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यांतील माझ्या सर्व भगिनी मला चांगले ओळखतात. महिलांसाठी आश्रय फाउंडेशन व भाजपाच्या माध्यमातून खूप चांगले काम केले आहे. महिला मेळावे, लाडकी बहीण योजना, महिला बचत गट, आरोग्य शिबिरे यांद्वारे महिला सशक्तीकरण करणे आमचे उद्दीष्ट आहे. यापूर्वी महिलांसाठी उदासीन लोकप्रतिनिधी होते. मला कुठलाही फॅमिली बॅकग्राऊंड नाही, एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. दोन्ही तालुक्यांतील लोक घराणेशाहीला कंटाळले आहे. मतदार माझ्यासारख्या नवीन आणि कोरीपाटी चेहऱ्याला संधी देतील.महिला, पुरुष, युवक सर्वांकडून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे.”
डॉ. फेगडे पुढे म्हणाले, “मला संधी मिळाल्यास मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना देण्यात येईल. दोन्ही तालुक्यांतील जनतेला महाराष्ट्रभर आरोग्यासाठी निःशुल्क उपचार उपलब्ध केले जातील.पिक विमा संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. रस्त्यांची समस्या सोडली जाईल युवकांना उद्योजक करण्याचे माझ ध्येय आहे पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली जाईल.माझ्या कार्यकाळात इतर तालुक्यांना हेवा वाटवा असा मतदारसंघ मला रावेर यावल करायचा आहे दोन्ही तालुक्यांतील मायबाप जनतेला विनंती आहे की घराणेशाही संपवून नव्या काम करणाऱ्या, अडचणींना धाऊन येणाऱ्या, मतदारसंघाचा विकासाचे ध्येय असलेल्या व्यक्तीला, सर्वसाधारण कार्यकर्त्याला आगामी निवडणुकीत सहकार्य करण्याचे त्यांनी शेवटी सांगितले”