पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरात सालाबादप्रमाणे शनि मंदीर संस्थान पारोळा यांचे तर्फे २० ऑगस्ट २०२२ शनिवार रोजी दुपारी १२ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तर रात्री रात्री ८.३० वा. ह.भ.प. जळकेकर महाराज यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी दु. ३ वा. अमळनेर रस्त्यावरील शनी मंदिर जवळ कुस्त्यांची भव्य ओपन दंगल देखील आयोजित करण्यात आली आहे. माजी खासदार ए.टी. पाटील यांचे हस्ते आखाडा पुजन होणार आहे. पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव अमळनेर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुस्तीप्रेमींनी कुस्त्यांची भव्य ओपन दंगल कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आहवान श्री शनि मंदीर संस्थान, पारोळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.